कवी · काटोल, जि. नागपूर
राजकुमार भेलकर
शब्दांचा सुगंध · भावनांची गझल

राजकुमार भेलकर, काटोल
निवडक कविता
एक एक शब्द, एक एक चित्र
किती भयभीत होते, कालचे हेच वारे वाचा → काय फायदा झाला आनंदाची पुंजी मी तर गुंतवतच आलेलो
व्याजाचे ना हसणाऱ्यांचा काय फायदा झाला वाचा → मळा बहरला स्वतःच ज्याला माहित नाही कुठे जायचे
त्या रस्त्यावर का फिरतो मी माहित नाही वाचा → सजायाचे कशाला सजायाचे कशाला एवढे गुलजार आहे
तुझे साधेच दिसणेही फुलांची हार आहे वाचा → पाऊस पाऊस थेंबांचा …..
टपोर बिलगतो तन मनाला वाचा → झूल शब्दांच्या पलिकडचे सारे
सुख मनावर पांघरते वाचा → धुंद हे असे तुझे ही कथाच आगळी ठरे कवी इथे फिका
दुःख शायरीत पार आतले भिडायचे वाचा → काहीही होणार नव्हते गायचे होते अभंग मुक्तीचे कधी तरी
भंग होणे जीवनाचे गीत नित्याचेच झाले वाचा →
काहीही होणार नव्हते व्हायचे जे तेच झाले
वाटले की जिंदगीचा डाव हरतो तेच झाले
करपूनी गेली गावची मस्तदिल नेक नाती
कालच्या हसऱ्या नात्यांना सुतकी रोमांच आले
चांदण्याच्या वेशीतच अंधार त्यांनी टांगलेला
उजेडल्या देशी तमाला फुटवे जुनेच आले
कोरडे पाणोठे आणि वांझ झाल्या पाणपोया
त्या तहानेल्या सुखांवर बाटल्यांचे पेच आले
कोड्याहून जटिल घोर गुंतवळ जगण्यात आली
निभावणे नव्हतेच सारे पण निभावणेच आले
डोळसाने आंधळ्यांना सांगू नये काही अता
हे तुझ्या माझ्याच नाही सकल स्वार्थाचेच झाले
खूप काही सोपे नव्हते मी मला समजावणे
रे गड्या इथे निरंतर हाल सत्याचेच झाले
गायचे होते अभंग मुक्तीचे कधी तरी
भंग होणे जीवनाचे गीत नित्याचेच झाले
हा उन्हाळा काय भारी गारवा घेवून आला
घामओल्या तुला अनाहूत वारे खेटतेच आले
समाप्त
पूर्ण कविता वाचा →गझलनुमा
काहीही होणार नव्हते
राजकुमार भेलकर
काहीही होणार नव्हते
— राजकुमार भेलकर
काहीही होणार नव्हते व्हायचे जे तेच झाले
वाटले की जिंदगीचा डाव हरतो तेच झाले
करपूनी गेली गावची मस्तदिल नेक नाती
कालच्या हसऱ्या नात्यांना सुतकी रोमांच आले
चांदण्याच्या वेशीतच अंधार त्यांनी टांगलेला
उजेडल्या देशी तमाला फुटवे जुनेच आले
कोरडे पाणोठे आणि वांझ झाल्या पाणपोया
त्या तहानेल्या सुखांवर बाटल्यांचे पेच आले
कोड्याहून जटिल घोर गुंतवळ जगण्यात आली
निभावणे नव्हतेच सारे पण निभावणेच आले
डोळसाने आंधळ्यांना सांगू नये काही अता
हे तुझ्या माझ्याच नाही सकल स्वार्थाचेच झाले
खूप काही सोपे नव्हते मी मला समजावणे
रे गड्या इथे निरंतर हाल सत्याचेच झाले
गायचे होते अभंग मुक्तीचे कधी तरी
भंग होणे जीवनाचे गीत नित्याचेच झाले
हा उन्हाळा काय भारी गारवा घेवून आला
घामओल्या तुला अनाहूत वारे खेटतेच आले
कविता संग्रह
शब्दांची मैफल
२० कविता
असे सरासर
असे सरासर कसे भराभर अंगावरुनी जातेइथून कोणी रोज सुगंधी सरसर निघुनी जाते ✦ ० वाचा →
दिवाळखोरी
दिवटीच्या अस्तामागेअंधार पाहुणा येतो ✦ ० वाचा →
केल्यावर तिच्यातून बाद मला
केल्यावर , तिच्यातून , बाद मलाआली ती , दिवसरात्र , याद मला ✦ ० वाचा →
सखे भवती तुझ्या
श्वास निवांत आजचा, मला सांगून गेलाकिती भयभीत होते, कालचे हेच वारे ✦ ० वाचा →
काय फायदा झाला
आनंदाची पुंजी मी तर गुंतवतच आलेलोव्याजाचे ना हसणाऱ्यांचा काय फायदा झाला ✦ ० वाचा →
तीर पाहिजे तिथे
तीर पाहिजे तिथे लागला डोळ्यांचा सुटल्यावरजन्मभराचे नाव गोंदले उभयांच्या हृदयावर ✦ ० वाचा →
मळा बहरला
स्वतःच ज्याला माहित नाही कुठे जायचेत्या रस्त्यावर का फिरतो मी माहित नाही ✦ ० वाचा →
पाऊस
पाऊस थेंबांचा …..टपोर बिलगतो तन मनाला ✦ ० वाचा →
सजायाचे कशाला
सजायाचे कशाला एवढे गुलजार आहेतुझे साधेच दिसणेही फुलांची हार आहे ✦ ० वाचा →
झूल
शब्दांच्या पलिकडचे सारेसुख मनावर पांघरते ✦ ० वाचा →
मनाला ही अशी तगमग
मनाला ही अशी तगमग , किती हा भार आहेतिच्या लोभस बहाण्याने उसवलो पार आहे ✦ ० वाचा →
धावण्याला अंत नाही
धावण्याला अंत नाहीअन् कुणाला खंत नाही ✦ ० वाचा →
अंग भरे सरसर पण
अंग भरे सरसर पण झोप उरी ना शिरलीयाद सरे ना मधुरा रात्र कुशींवर सरली ✦ ० वाचा →
काय हे भवती
काय हे भवती पुन्हा गंधाळलेपाय हे माझे तिथे रेंगाळले ✦ ० वाचा →
धुंद हे असे तुझे
ही कथाच आगळी ठरे कवी इथे फिकादुःख शायरीत पार आतले भिडायचे ✦ ० वाचा →
स्पर्श झाला तुझा
स्पर्श झाला तुझा रेशमी वाटलेडुचमळू लागले स्पंद हृदयातले ✦ ० वाचा →
घरी ऊन आले
घरी ऊन आले नि जो वास झालाकमी सावलीचा तसा जाच झाला ✦ ० वाचा →
काहीही होणार नव्हते
गायचे होते अभंग मुक्तीचे कधी तरीभंग होणे जीवनाचे गीत नित्याचेच झाले ✦ ० वाचा →
वंचनेतून एकदा
वंचनेतून एकदा जाईन म्हणालोआसवांना हाकूनी पाहीन म्हणालो ✦ ० वाचा →
भूतकाळाच्या अंधारातून
भूतकाळाच्या अंधारातून जळणे आलेआज उजेडी जगण्यानेही छळणे आले ✦ ० वाचा →
या शोधासाठी कविता सापडली नाही. वेगळा शब्द किंवा फिल्टर वापरून पहा.


कवी परिचय
राजकुमार भेलकर
Rajkumar Bhelkar · काटोल, जि. नागपूर
काटोल (जि. नागपूर) येथील कवी. गझल, गझलनुमा आणि मुक्तछंद कविता लिहितात.
त्यांच्या रचना मराठी, हिंदी आणि English अशा तिन्ही भाषांत वाचा.
- २०कविता
- १७गझल
- १भाषा
संपर्क
कविता आवडली? दाद द्या!
प्रत्येक कवितेखाली शिक्क्याला स्पर्श करून तुमची “वाह!” दाद कळवा.